ऑस्लोद : नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात नॉर्वेत लसीकरणास सुरुवात झाली. लस टोचण्यात आल्यावर तिचे दुष्परिणाम दिसतील, अशी माहिती नॉर्वे सरकारकडून आधीच देण्यात आली होती. आतापर्यंत नॉर्वेत ३३ हजार जणांना लस देण्यात आली आहे. त्यानंतर २९ जणांमध्ये या लसीचे दुष्परिणाम दिसून आले असून यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. फायझरची लस नॉर्वेत नागरिकांना दिली जात आहे.
देशाचे राष्ट्रीय प्रसारक एनआरकेशी नॉर्वेच्या औषध संस्थेचे प्रमुख वैद्यकीय संचालक स्टेइनार मॅडसेन यांनी संवाद साधला. आतापर्यंत कोरोना लस देण्यात आलेल्या २३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १३ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ९ जणांना गंभीर स्वरुपाचे साईड इफेक्ट्स जाणवले. तर ७ जणांमध्ये आढळून आलेल्या साईड इफेक्ट्सचे स्वरुप गंभीर नसल्याची माहिती मॅडसेन यांनी दिली.
लसीकरणानंतर मृत्यूमुखी पडलेले सगळे जण वयोवृद्ध असल्याची माहिती मॅडसेन यांनी दिली. लस टोचल्यानंतर मृत्यू पावलेल्या लोकांची तपासणी करण्यात आली. यातील सगळेजण वयोवृद्ध होते. नर्सिंग होममध्ये ते राहायचे. या सगळ्यांचे वय ८० च्या पुढे होते आणि या व्यक्ती आजारी होत्या. कोरोना लस देण्यात आल्यानंतर त्यांना ताप आला. सोबतच त्यांना अस्वस्थतेचा सामना करावा लागल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि ते मृत्यूमुखी पडले, असे मॅडसेन यांनी सांगितले.
नॉर्वेमध्ये घडलेला प्रकार प्रकार दुर्मिळ असल्याची माहिती स्टेइनार मॅडसेन यांनी दिली.
गेली. मात्र त्यांना कोणताही धोका जाणवला नाही. त्यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याचे मॅडसेन यांनी म्हटले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
