मुंबई : भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका शिवसेनेने केली होती. त्याला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेने नागपूरमध्ये जाऊन हिंदुत्वाचा क्लास लावावा, असा टोला लगावतानाच अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना दिशाहीन झाली आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.
आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. शिवसेनेने हिंदुत्वावर भाष्य करू नये. हिंदुत्वाचा खरा क्लास लावावा. नागपूरच्या कार्यालयात तुन्ही नेहमी जात असता. आताही जा आणि हिंदुत्व समजून घ्या, असा टोला शेलार यांनी लगावला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
