मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. राऊत यांच्या घरातील हे पहिलंच मंगलकार्य आहे.राऊत यांची मुलगी पूर्वेशीचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे सुपूत्र मल्हार नार्वेकर यांच्याशी साखरपुडा संपन्न झाला आहे.
संजय राऊत यांची कन्या पूर्वेशी राऊत आणि मल्हार नार्वेकर यांचा मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये छोटेखानी समारंभात साखरपुडा पार पडला. यावेळी संपूर्ण राऊत कुटुंब हजर होतं.
संजय राऊत यांचे व्याही हे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी याआधी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काम केले आहे. तसंच 2018 मध्ये मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून सुद्धा काम पाहिले होते.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
