सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. या वेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार असा करत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
राज्यात तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार तयार झाले असून या ओटोरिक्षाचे प्रत्येक चाक वेगवेगळ्या दिशेला जात आहे, असे शहा म्हणत सरकारमधील तिन पक्षांमध्ये समन्वय आणि एकवाक्यता नसल्याचे शहा यांनी सूचिक केले. शिवसेनेने नंतर दगाबाजी केली, अशी टीका त्यांनी केली. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर जाऊन बसले. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती असेही शहा पुढे म्हणाले.
अमित शहा यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका करताना पुढे म्हटले की, तुम्ही म्हणता की मी बंद खोलीत वचन दिले. मात्र मी बंद खोलीत कधीही वचन देत नसतो, तर खुलेआम वचन देतो. मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेशी कोणत्याही प्रकारचे बोलणे झालेले नाही, सांगतानाच यांनी पंतप्रधान मोदी यांची मोठी पोस्टर्स लावून तत्वासाठी मते मागितली. त्यावेळी आम्ही मंचावरून आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, ते मुख्यमंत्री बनतील असे सतत सांगत होतो. त्यावेळी तुम्ही काही का बोलला नाहीत, असा सवाल केला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
