मुंबई : भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पोलीस दलात बदल्या करण्यासाठी गैर प्रकार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या आरोपांना उत्तर देत राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावरच गंभीर आरोप केला आहे.
‘फडणवीस हे सत्ता गेल्यामुळे हतबल झाले आहे. सरकार पाडता येत नाही आमदार फुटत नाही म्हणून वाटेल ते आरोप करत आहे. फडणवीस यांनी दिलेली माहिती संपूर्ण खोटी आहे. त्यांनी सरकारला बदनाम करण्याचे काम केले आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.
अनिल देशमुख हे क्वारंटाइन होते. ते कुठेही गेले नाही. पण त्यांच्याबद्दल फडणवीस खोटे आरोप करत आहे. जे अधिकारी दिल्लीत गेले. मुळात राज्यातून भाजप सरकार गेल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली.’रश्मी शुक्ला यांनी परवानगी न घेता फोन टॅप केले. सरकार बनवण्याचे काम सुरू होते. शुक्ला फोन टॅप करत होत्या, त्या भाजपासाठी काम करत होत्या,असा आरोपही मलिक यांनी केला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस