करमाळा : करमाळा तालुक्यातील तीनजणांना ठार केलेल्या नरभक्षक बिबट्याला शुक्रवारी (ता.१८) रोजी ठार मारण्यात वन विभाग व शार्प शूटरना यश आले. बिबट्या ठार झाल्याने करमाळा तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

फुंदेवाडी येथील कल्याण फुंदे, अंजनडोह येथील जयश्री शिंदे व चिखलठार येथील ऊसतोडणी मजुराची आठ वर्षीय मुलगी फुलाबाई हरिचंद यांना या बिबट्याच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले होते.
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागासह शार्प शूटर, ड्रोन कॅमेरे, डॉग स्क्वाड आदी लवाजमा घेवून करमाळा तालुक्यात फिरत होते. परंतु बिबट्या त्यांना चकवा देवून दोन वेळा फरार झाला होता. परंतु शेवटी आज (शुक्रवारी) बिबट्याला ठार मारण्यात यश आले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज