मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली. तसेच त्यांनी डॉक्टर्स आणि त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत. पवार यांनी ट्विट करून म्हटले आहे, ‘डॉ. लहाने व त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार!’
दुसऱ्या ट्विटमध्ये पवार यांनी म्हटलंय-‘योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की, आपणही कोरोना लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा.’
आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. ते म्हणाले, संपूर्ण जग गेले वर्षभर कोरोना विषाणूशी लढा देत आहे. बदलत्या परिस्थितीत आव्हानांना सामोरं जाताना आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्कचा वापर करा. सुखी व निरोगी आयुष्यासाठी सर्वांना शुभेच्छा!
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस