मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यानंतर आता राजकीय नेत्यांकडून त्यांच्याविषयी सदिच्छा व्यक्त केली जात आहे. काहीवेळापूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीही फोन करून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे. वेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही शरद पवार यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मात्र, शरद पवार आणि अमित शाह यांच्या कथित भेटीची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील संदर्भ अचानक बदलले आहेत. विशेष म्हणजे शरद पवार आपल्या ट्विटर हँडलवरून प्रकृतीची विचारपूस करणाऱ्या नेत्यांचे आभार मानत आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस