मुंबई : महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीत काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर चांगलेच नाराज असल्याचे वृत्त येत आहे. तसेच अनिल देशमुख यांना हटवण्यात येणार असल्याचीही चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नावे गृहमंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची मात्र या दोन नेत्यांऐवजी तिसऱ्याच नेत्याच्या नावाला पसंती असल्याची चर्चा आहे.
मात्र मिळत असलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे गृहमंत्रिपदासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याऐवजी तिसऱ्याच नेत्याचा गृहमंत्रिपदासाठी विचार करत आहेत. कोरोना काळात राज्याच्या आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळणाऱ्या राजेश टोपेंकडे गृहमंत्रालयाची जबाबदारी सोपवण्याचा शरद पवार यांचा विचार आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यास गृहमंत्रिपदासाठी राजेश टोपेंचे नाव आघाडीवर असेल, तसेच गृहमंत्रालयाचा कारभार त्यांच्याकडे जाईल अशी शक्यता आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस