मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रीती राज श्रॉफ व जावई राज श्रॉफ यांची सुमारे 35.48 कोटी रुपयांची कोट्यावधीची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. अंधेरी पूर्व येथे कालेडोनिया या इमारतीत प्रीती व राज यांच्या मालकीच्या जवळपास 10 हजार 550 स्क्वेअर फिटच्या दोन कमर्शियल मालमत्ता असून त्या ईडीने जप्त केल्या आहेत.दीवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवान यांच्याशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
दिवाळखोरीत निघालेल्या डीएचएफएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांनी पीएमसी बँकेत केलेल्या कर्ज घोटाळ्याच्या अनुषंगाने मनी लाँडरिंगचाही गुन्हा दाखल आहे. त्याच गुन्ह्यात मेसर्स जिंदल कंबाइन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स ओरलँडो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे मालक असलेल्या प्रीती व राज श्रॉफ यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेने दीवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडला दिलेलं 3,688.58 कोटी कर्ज हे घोटाळा घोषित केले आहे. यस बँकेतील घोटाळ्याबाबतही या कंपनीची चौकशी सुरु आहे. कंपनीचे प्रमोटर वाधवान बंधू अटकेत आहेत आणि त्यांची मालमत्ता देखील ईडीने जप्त केली आहे. यस बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने माजी बँक प्रमुख राणा कपूर आणि डीएचएफएलचे प्रमोटर कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्याकडे 2400 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस