• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

सरपंच आणि सदस्यपद लिलाव प्रकरण : “या” ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द

tdadmin by tdadmin
January 13, 2021
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी आज येथे केली.

 

श्री.मदान यांनी सांगितले की, उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर आयोगाकडे तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आयोगाने अहवाल मागविले होते. जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचा अहवाल; तसेच विविध कागदपत्रे आणि ध्वनिचित्रफितींचे अवलोकन केल्यानंतर या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. खोंडामळी येथील लिलावप्रकरणी आधीच नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता अधिक तपास करून भारतीय दंड विधानाचे कलम 171 (क) अथवा अन्य कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश नाशिक आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.

 

केवळ काही ग्रामस्थांच्या एकतर्फी दबावात्मक निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांना मुक्त वातावरणात निवडणूक लढविण्यापासून आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार या दोन्ही गावांमध्ये झाला आहे. यातून लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचे आणि आचारसंहितेचा भंग झाल्याचे सकृतदर्शनी सिद्ध होत आहे. अशा प्रकारांमुळे निवडणूक लढविण्याची सर्वांना समान संधी प्राप्त होऊ शकत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणूक घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. ही संविधानात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयोगाने या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, असे श्री. मदान यांनी सांगितले.

 

Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस

Tags: #Sarpanch and membership auction case
Previous Post

“न्यायालयाने शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग केला आहे” : राजू शेट्टी

Next Post

कोरोना लसीचे डोस सांगली जिल्ह्यात दाखल : पहा व्हिडीओ

Next Post

कोरोना लसीचे डोस सांगली जिल्ह्यात दाखल : पहा व्हिडीओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“या सुसाईड नोटमध्ये कुठल्याही भाजपच्या नेत्यांची नावे नाहीत” : फडणवीस

“या सुसाईड नोटमध्ये कुठल्याही भाजपच्या नेत्यांची नावे नाहीत” : फडणवीस

March 1, 2021
‘शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार’ : ‘या’ भाजप नेत्याच्या ट्विटने खळबळ

‘शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार’ : ‘या’ भाजप नेत्याच्या ट्विटने खळबळ

March 1, 2021
जयंत पाटील यांच्या सुपुत्रांना कोरोनाची लागण

जयंत पाटील यांच्या सुपुत्रांना कोरोनाची लागण

March 1, 2021
“पंतप्रधानांनी लस घेताना मास्क घालून सर्वसामान्यांपर्यंत चांगला संदेश पोहचवायला हवा होता” : मोदींवर संतापले नेटकरी

“पंतप्रधानांनी लस घेताना मास्क घालून सर्वसामान्यांपर्यंत चांगला संदेश पोहचवायला हवा होता” : मोदींवर संतापले नेटकरी

March 1, 2021
“मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ आणि आमचे मुख्यमंत्री सर्वांना सोशल डिस्टंसिंगचं ज्ञान वाटत आहे” : नितेश राणे

“मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ आणि आमचे मुख्यमंत्री सर्वांना सोशल डिस्टंसिंगचं ज्ञान वाटत आहे” : नितेश राणे

March 1, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर शरद पवारांनीही घेतली कोरोनाची लस

पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर शरद पवारांनीही घेतली कोरोनाची लस

March 1, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143