आटपाडी : पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. पूजा चव्हाण या तरुणीसोब संजय राठोड यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. यापार्श्वभूमीवर संजय राठोड यांना अखेर राजीनामा द्यावा लागला.
तसेच यापुर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. पण याप्रकरणात ठाकरे सरकारने वेगळा न्याय का केला? शरद पवार असे धाडस कधी दाखवणार? असे प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत. तर आमदार नितेश राणे यांनी सामान्य शिवसैनिकाला एक न्याय व मुलगा आहे म्हणून एक न्याय? असे म्हणत मंत्री आदिय ठाकरे यांचा राजीनामा मुख्यमंत्री कधी घेणार असा सवल केला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस