आटपाडी : झरे ता. आटपाडी येथे राहणारे शिक्षक प्रशांत बापूसाहेब स्वामी यांचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडले असून सोने,चांदी व रोख रक्कमेसह ५ लाख १० हजार रुपयांची जबरी चोरी केल्याने झरे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
झरे येथे राहणारे प्रशांत बापूसाहेब स्वामी हे शिक्षक आहेत. त्यांची भाची प्रणाली गुरुलिंग स्वामी हिचे दि.२४/१२/२०२० रोजी लग्न कार्य असल्याने ते घर बंद करुन घरास कुलुप लावुन लग्नकार्यासाठी गेले होते. या संधीचा अज्ञात चोरट्यांनी फायदा उचलत दिनांक २२ ते दिनांक २४ च्या दरम्यान त्यांचे घर अज्ञात चोरटयाने फोडले.
यावेळी त्यांच्या घरातील १). ७५,०००/- रु अडीच तोळयाचे सोन्याची चैन जु.वा.कि.अं. २) ३०,०००/- रु एक तोळयाचे वेडण अंगठी जु.वा.कि.अं. ३) १,०५,०००/- रु एक साडे तीन तोळयाचे सोन्याचे गंठण जु.वा.कि.अं. ४) ४५,०००/- रु एक दीड तोळयाचे सोन्याचे मंगळसुत्र काळे मनी असलेले जु.वा.कि.अं. ५) ४०,०००/- रु १४ ग्रॅम वजनाच्या चार जोड कानातील सोन्याच्या रिगा जु.वा.कि.अं. ६) ५,०००/- रु ३ ग्रॅम वजनाची सोन्याची लेडीज अंगठी जु.वा.कि.अं. ७) १५,०००/- रु चांदीचे भांडी त्यात चांदीचे ताट,दोन वाटया,एक चमचा,चार निरजंन, दोन कुकवाचे करंडे व दोन जोडवी व दोन पैजन. जु.वा.कि.अं. ८) १,९५,०००/- रु रोख रक्कम असा एकूण ५,१०,००० रुपयांवर डल्ला मारला आहे.
याबाबत आटपाडी पोलीस ठाणे येथे प्रशांत बापूसाहेब स्वामी यांनी फिर्याद दिली असून भा.दं.वि.स.कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
