डोंबिवली : मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे जोडीदार आणि मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटिल हे सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत. कोरोना पाॅझिटिव्ह झाल्यानंतर मनसे आमदार यांची फेसबुक पोस्ट आता चांगलीच व्हायरल झाली आहे.
यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मनसे आमदार राजू पाटील यांना उद्देशून ट्वीट करत लवकर बरे व्हा, अश्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी कधीही रोहित पवार आणि राजू पाटील एकत्र दिसले नाहीत. त्यामुळेच रोहित पवार यांच्या ट्वीटची चर्चा होते आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस