नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची ढासळली आहे. लालू यांच्या फुफ्फुसात पाणी झालं असून, चेहऱ्यावर सूज आली आहे. त्यांची एक किडनीही खराब झाली असून, प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी वडिलांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिली. लालू प्रसाद यादव यांना दिल्लीतील एम्समध्ये हलवण्याची शक्यता असून, तेजस्वी यादव उद्या भेट घेणार आहेत.
लालू प्रसाद यादव यांची भेट घेतल्यानंतर तेजस्वी यादव यांनी माध्यमांना त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. “त्यांच्यावर चांगल्या ठिकाणी उपचार करण्याची आमची इच्छा आहे. पण, जोपर्यंत सर्व चाचण्याचे अहवाल येत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही त्यांच्या चाचण्याचे रिपोर्ट येण्याची वाट बघत आहोत. त्यांची शुगर वाढली असून, किडनी व्यवस्थित कार्यरत नाही. त्यांच्या फुफ्फुसात पाणी झालं आहे. त्याचबरोबर चेहऱ्यावर सूज आली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे,” अशी माहिती तेजस्वी यांनी दिली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
