मुंबई : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या पार्श्वसभूमीवर टोपे यांनी गुरुवारी या इंजेक्शनचे उत्पादन करणार्याव सात कंपन्यांची बैठक घेतली. बैठकीस सिप्ला, झायडस, हेट्रो, डॉ. रेड्डी, सन फार्मा, ज्युबिलिएंट या कंपन्यांचे प्रमुख अधिकारी आणि इंडियन फार्मास्युटिकल्स असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राला रेमडेसिवीरची कमतरता भासू नये यासाठी कंपन्यांनी या इंजेक्शनचा पुरवठा एमआरपी कमी करून थेट शासकीय रुग्णालये आणि जिल्हाधिकार्यां ना करावा, अशा महत्त्वपूर्ण सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी केल्या.
राज्यात 1 हजार 100 ते 1 हजार 400 रुपये या किमतीत रेमडेसिवीर मिळाले पाहिजे, असे सांगतानाच उत्पादक कंपन्यांनी इंजेक्शनचा पुरवठा जिल्हाधिकार्यांमकडे केल्यास ते खासगी रुग्णालयांना रेमडेसिवीरचा पुरवठा करतील, अशी यंत्रणा उभारा, असे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस