आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणूची साखळी काही प्रमाणात खंडित झाली आहे. तर आटपाडी शहरामध्ये ही रुग्ण संख्या कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आता पहिल्या टप्यातील कोरोना लस कोरोना योद्धे यांना देण्यात आली असून यापुढील काळात ती सर्वसामान्य रूग्णासाठी ती उपलब्ध असणार आहे.
आटपाडी तालुक्यात अजूनही जिल्ह्याच्या व इतर तालुक्यांच्या तुलनेत रुग्ण संख्या तशी दररोज ०१ ते ०५ च्या आत असली तरी सुद्धा ती जिल्ह्याच्या तुलनेते सर्वात जास्त होती. परंतु आज दिनांक १६ रोजी मात्र तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या ही निरंक आली असल्याने नागरीकाबरोबरच आरोग्य विभागालाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
जरी कोरोना या विषाणूची संसर्गजन्य विषाणूची साखळी काही प्रमाणात खंडित झाली असली व बाजारात त्यावर लस आली असली तरी अजूनही सर्वसामान्य नागरिकासाठी मात्र मास्क व सॅनिटायझर हेच लस असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस
