आटपाडी : स्प्राऊटिंग सीड्स आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेमध्ये 35 देशातील 471 लघुपट स्पर्धेसाठी दाखल झाले असून या लघुपटामधून 10 उत्कृष्ट अभिनेत्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये आटपाडीचे रविकिरण जावीर यांची उत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आलेली आहे. या निवड समितीमध्ये 10 राष्ट्रीय व परदेशी परीक्षकांनी परीक्षक म्हणून काम केलेले आहे.
रविकिरण जावीर यांच्या “मद द लिकर” या लघुपटातील भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून निवडण्यात आले आहे. या लघुपटामध्ये अनिषा जावीर, प्रीती भिसे, कुंडलिक केंगार, राजेंद्र पुजारी, गजानन यादव, अर्थ व पार्थ जावीर यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर चित्रण व संकलन योगेश व ऋषी स्वामी यांनी केले आहे.
या लघुपटाला पार्श्वसंगीत श्री समाधान ऐवळे (बोधी साऊंड) यांनी दिलेले आहे. लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन स्वतः रविकिरण जावीर यांनीच केलेले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, दिनांक 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या अंतिम निवडीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस



