पुणे : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना १५ डिसेंबरला पुण्यात अटक करण्यात आली. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली हर्षवर्धन जाधव आणि अजून एका महिला विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा या दोघांविरोधात अमन चड्डा यांनी फिर्याद दिली होती. आता न्यायालयाने या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. हर्षवर्धन जाधवांनी केलेला गुन्हा हा मोठा गुन्हा आहे, असे न्यायाधीशांचे म्हणणे आहे. त्यामुळे जामीन देण्यात आला नाही. सोमवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहोत, अशी माहिती यावेळी बचाव पक्षाचे वकील झहीर खान यांनी दिली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
