आटपाडी : राजेवाडी ता. आटपाडी, जि.सांगली येथील ग्रामसेवक जीवे मारण्याची धमकी दिल्याने याबाबत आटपाडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिका माहिती अशी की, राजेवाडी ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक म्हणून दत्तात्रय गळवे हे यांची नेमणूक आहेत. यातील आरोपी सचिन दशरथ सातपुते यांच्या वडिलांच्या नावे राजेवाडीयेथील असलेल्या मिळकतीची नोंद राजेवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी बैठकीत रद्द केली होती.
याबाबत सचिन सातपुते यांनी ग्रामसेवक दत्तात्रय गळवे यास दिनांक ३० रोजी भ्रमणध्वनीद्वारे “झालेल्या सभेचे इतिवृत्त लिहायचे नाही, लिह्लेस तर दप्तर जाळून टाकीन, गावात तुका नोकरी करायची आहे असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.”
याबाबत ग्रामसेवक दत्तात्रय गळवे यांनी आटपाडी पोलिसात तक्रार दिली असून सदर घटनेचा अधिक तपास ASI चोरमले हे करीत आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस