सांगली : नगरपालिका व ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांविरूध्द मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी दर्शनी भागात फलक लावावेत, असे निर्देश उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे यांनी दिले.
जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. बैठकीस पोलीस उपअधीक्षक किशोर काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. अरविंद देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, ग्राहक संघटनेचे डॉ. ज्ञानचंद्र पाटील, सुरेश भोसले यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत सर्व तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य अधिकारी यांना अवैद्य/बोगस वैद्यकीय व्यवसायिकांचे सर्व्हेक्षण करून माहिती सादर करण्याबाबत कळविण्यात आल्याचे सांगितले. बैठकीत बोगस डॉक्टरांबाबत जनजागृती, उपचारांबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, बोगस डॉक्टरांवर कारवाई करिता धडक मोहिमा आदिच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस



