नवी दिल्ली : आंदोलक शेतकऱ्यांना जेलमझध्ये टाका आणि त्यांची संपत्ती जप्त करा, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या हिंसाचारावर अभिनेत्री कंगना रानौत म्हणाली आहे. कंगनाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिने आंदोलक शेतकऱ्यांवर सडकून टीका केली
“मित्रांनो आपण बघत आहोत की, कशाप्रकारे आज प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हल्ला करण्यात आला. तिथे खलिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला आहे. कोरोना संकटावर आपण यशस्वी मात करत पुढे गेलो. याशिवाय या संकट काळात आपण पूर्ण जगाचं प्रतिनिधित्व करत आहोत. मोजक्याच देशांना हे यश मिळालं आहे. त्याच देशांपैकी आपण एक आहोत”, असं कंगना म्हणाली.
“आपल्या देशाने कोरोना लस तयार केली. त्याचा आनंद आज आपण साजरी करु शकत होतो. पण तुम्ही बघत आहात की, आज संपूर्ण जगाला कशाप्रकारे जखडून ठेवलं गेलं आहे. लाल किल्ल्याचे फोटो येत आहेत. हे दहशतवादी जे स्वत: ला शेतकरी म्हणतात त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. सर्वांसमोर हा तमाशा सुरु आहे”, असं घणाघात तिने केलं.
“आज जगात आपली थट्टा होत आहे. आपली काहीच इज्जत राहिलेली नाही. जेव्हा दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष देशात येतो तेव्हा काही लोकं नंगे होऊन बसतात. या देशाचं काहीच होणार नाही. कुणी या देशाला एक पाऊल पुढे घेऊन जात आहे, तर काही लोक देशाला दहा पावलं मागे खेचत आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांना जेलमध्ये टाका. त्यांची संपत्ती हिसकावून घ्या. काहीतरी नियम असले पाहिजेत”, अशा शब्दात कंगनाने रोष व्यक्त केला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
