पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यातील संभाषणाच्या 12 ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहे. पूजाचा लॅपटॉप हा भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांच्याकडे असल्याचा संशय पुणे पोलिसांना आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी धनराज घोगरे यांनी नोटीस बजावली असून पूजाचा लॅपटॉप आणून देण्याची मागणी या नोटीसीतून केली आहे.
या प्रकरणी 12 ऑडिओ क्लीप समोर आल्या आहेत. या ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरल झाल्या आहेत. त्यातून या क्लीप नेमक्या कशा बाहेर आल्या याबाबत विचारणा केली जात आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळीच भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने अरूण राठोडकडून या ऑडिओ क्लीप काढून घेतल्याचं समोर येत आहे. तसेच त्याचवेळी त्यांच्या फोटो आयडीचे फोटो काढून घेतल्याचं सांगितलं जात आहे. अखेर पुणे पोलिसांनी पहिल्यांदाच नोटीसीमध्ये भाजपच्या नगरसेवकाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून आणखी वाद पेटण्याची चिन्ह आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस