निंबवडे : राज्यभरात सरकार चा वीज दरवाढ संदर्भात भाजप च्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून सरकार ला जाग आणण्यासाठी आज दिनांक ०५ रोजी आटपाडी वीज महावितरण कार्यालय ला टाळे ठोको आंदोलन जिल्हा परिषद चे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या नेतृत्वात आटपाडी येथे करण्यात आले.
यावेळी बोलताना जयवंतराव यांनी हे सरकार नाटकी असून सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याशी खेळत असल्याची घणाघाती टीका केली. मोर्चाच्यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे , जेष्ठ नेते हरीशेठ गायकवाड , विष्णु अर्जुन , उमाजी सरगर, गणेश भुते व आटपाडी तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी, शेतकरी , कार्यकर्ते उपस्थित होते.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस