पंढरपूर : पंढरपूरमध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या माजी शहराध्यक्षाला तोंड काळे करून चांगलाच चोप दिला. या कृत्यावरून भाजपचे आमदार राम कदम शिवसेनेवर चांगलेच संतापले आहे. राम कदम यांनी शिवसैनिकांनी भाजपच्या माजी शहराध्यक्षाला मारहाणीचा व्हिडीओ ट्वीट करुन शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या पोलिसांच्या समोर कायदा हातात घेऊन नंगानाच ? राज्यात सत्ता आहे याचा इतका दुरुपयोग, सैनिकाच्या घरात घुसून त्याला मारण्यापासून पंढरपूरच्या रस्त्यावर खुद्द पोलिसांसमोर कायदा हातात घेण्यापर्यंत शिवसेना कार्यकर्त्यांची मजल जाते, अशा शब्दांत राम कदम यांनी संताप व्यक्त केला.

तसंच, हे सगळे ठरवून होत आहे का? निद्रिस्त अवस्थेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने या हल्लेखोरांवर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारत त्याची जागा दाखवून देईल, असा इशाराही राम कदम यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार,पंढरपूर भाजप माजी अध्यक्ष शिरीष कटेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यामुळे पंढरपूरमध्ये शिवसैनिकांनी कटेकर यांच्या तोंडाला काळे फासले. विठ्ठल मंदिर परिसरातील नामदेव पायरी ते पश्चिम द्वारापर्यंत कटेकर यांची धिंड काढली. यावेळी शिवसैनिकांनी कटेकर यांना चोप देत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
