नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोना व्हायरस लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असून या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लस देण्यात येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत अशी माहिती दिली की, नंतरच्या टप्प्यामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नेतेमंडळींचा समावेश असेल. आरोग्यसेवा देणारे कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स अर्थात पोलीस, महानगरपालिका कर्मचारी यांच्यानंतर लसीकरण होणारी तिसरी श्रेणी 50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील असेल. त्यानंतरच्या 50 वर्षांखालील लोक असण्याची शक्यता आहे.
सरकारने याआधीच स्पष्ट केले होते की, लसीकरणाची मोहीम विविध टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की व्हॅक्सिनेशनचा दुसरा टप्पा एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. ज्यामध्ये देशातील 50 पेक्षा अधिक वय असणाऱ्यांना मंत्र्यांना आणि लोकप्रतिनिधींना व्हॅक्सिन दिलं जाईल. यामध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
