मुंबई : कोरोना नावाच्या साथीचे मोठे संकट देशावर आले होते. मात्र कोरोना लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम जगात सर्वोत्तम असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे व धाडसी निर्णयामुळे 130 कोटी लोकसंख्या असलेला भारत देश कोरोनाच्या हाहाकारापासून सुरक्षित राहू शकला.
कोरोनाने देशभरात हाहाकार माजवलेला असताना या काळात संपूर्ण देशाने एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता होती. परंतु, प्रत्येक गोष्टीत विरोध करण्याची मानसिकता असणाऱ्या विरोधी पक्षांनी निरर्थक आरोप करण्याचेच काम केले, असेही ते यावेळी म्हणाले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
