आटपाडी : मराठीमध्ये लोकप्रिय म्हण आहे. “आपल्या तो बाब्या,दुसऱ्याचे ते कार्ट” सध्या या म्हणीचा प्रत्यय विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांना लागु पडत आहे.
राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी नुकतीच घोषणा केली होती. की त्यांच्या पारनेर विधानसभा मतदार संघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक करतील त्यांना आमदार निधीमधून २१ लाख रुपयांचा निधी देण्यात येईल.
या त्यांच्या निर्णयावर विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी जोरदार टीका केली होती. वरकरणी आमदार लंके यांची योजना ही चांगली असली तरी तरी ती प्रभोलन दाखवणारी आहे. असे प्रभोलन दाखविणे यीग्य नाही. त्यांनी प्रभोलन दाखविण्यापेक्षा तो निधी मतदार संघामध्ये खर्च करावा.
परंतु आता मात्र त्यांचाच पक्षाच्या जिंतूर-सेलू विधानसभेच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही त्यांच्या मतदार संघातील बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी २१ लाख रुपयांचा निधी देण्याच्या एकप्रकारे प्रभोलनच दाखविले आहे. त्यामुळे दरेकरांनी दुसऱ्या आमदाराना सल्ले देण्यापेक्षा आपल्या पक्षातील आमदारांना सल्ले द्यावे.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस
