मुंबई : पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नाव घेऊन आरोप केला आहे होता. त्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही हा मुद्दा उचलून धरला होता.
‘पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळं मला काल पासून धमक्यांचे फोन येतायत,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसंच, ‘ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. धमक्यांना बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही त्यांना धमक्यांचे फोन येत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही त्यामुळे उगा मला फोनकरून वेळ वाया घालवू नका माझ्या भावड्यांनो. जिथे जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होणार तिथे तिथे नडणार आणि भिडणारचं,’ असं वाघ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पूजाबाबत उलटसुलट चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या आहेत. त्यावर पूजाचे वडिल लहू चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कृपा करून आमची आणखी बदनामी करू नका. आमचे अर्धे कपडे काढलेच आहात. आता उरलेले कपडे तरी काढू नका. नाहीतर मलाही आत्महत्येचा मार्ग निवडावा लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
