मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या संदर्भांत लवकरच अनेक महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे.मनसुख हिरेन यांची हत्या झाली, त्यावेळी सचिन वाझे तिथेच उपस्थित होते, असा संशय एनआयएला आहे. मनसुख हिरेन यांची ठाण्याच्या गायमुख परिसरात हत्या केल्यानंतर, त्यांचा मृतदेह रेती बंदर येथील खाडीत फेकण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. यात, ठाणे येथील प्रभारी वरिष्ठ निरिक्षकाने त्यांना रेती बंदर परिसरात आणण्यास मदत केल्याचा संशय एनआयएला असून, त्या दिशेने आता तपास सुरू आहे.
मनसुख यांचा मृतदेह भरतीमुळे किनाऱ्याला परत येणार नाही, या भ्रमात सचिन वाझे होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने वाझेंवरचा तणाव वाढला आणि या तणावातून त्यांनी लागलीच स्वतःकडचे पाचही मोबाईल नष्ट केले होते, अशी धक्कादायक माहिती वाझेंनी एनआयएला दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता एनआयएने वाझेंच्या सर्व मोबाईलमधील डेटा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस