कडेगाव : २८ वर्षीय युवतीवर बलात्कार करून फरार झालेला संशयित आरोपी पोलीस निरीक्षक विपीन हसबनिसला याला तब्बल ३ महिन्यानंतर अटक झाली आहे. हसबनिस याचा उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने तो कडेगाव पोलीस ठाण्यात हजर झाल्याने पोलिसांकडून त्याला तात्काळ अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्पर्धा परीक्षामध्ये मार्गदर्शन करण्याच्या आमिषाने हसबनिस याने एका २८ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने मागील ३ महिन्यापासून हसबनिस फरार झाला होता. एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याबाबत बतावणी करून पीडित तरुणीला कडेगाव येथील बंगल्यावर आणून तिच्यावर बलात्कार केला असल्याची तक्रार पोलीस निरीक्षक हसबनिस यांच्या विरोधात संबंधित पीडित तरुणीने कडेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. तरुणीच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस याच्याविरुद्ध २८ ऑगस्ट २०२० रोजी कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
त्यांनतर हसबनीस याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्वसाठी जमीन अर्ज केला होता. परंतु सदरचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर हसबनिस याने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. हा जामीन अर्ज देखील २ दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने फेटाळला होता. आज दिनांक १७ रोजी कडेगाव पोलिस ठाण्यात हसबनिस हा हजर झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा तासगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे या करीत आहेत.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



