नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला आहे. यावर आता विविध पक्षांच्या समिश्र प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी संरक्षण क्षेत्रासाठी केलेल्या तरतूदीवरून मोदी सरकारला सवाल केला आहे.

राहुल गांधी ट्विट करत म्हणाले की, चीनने आपला भूभाग बळकावला आहे आणि आपले जवान शहीद झाले. पीआर फोटोसाठी पंतप्रधान मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. मग त्यांनी सैनिकांसाठी संरक्षणाचे बजेट का वाढवले नाही?
दरम्यान, या वर्षीच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 4 लाख 78 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही तरतूद 4 लाख 71 कोटी रुपये होती.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
