मुंबई : मुंबईतील खार येथील अभिनेत्री कंगनाच्या घरात अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवण्यात आला होता. या बद्दल मुंबई पालिकेनं कंगनाला नोटीस बजावली होती. याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी, घरात असलेल्या अनधिकृत बांधकाम तोडकाम प्रकरणी याचिका कंगनाकडून मागे घेण्यात आली आहे. जे काम अनाधिकृत आहे, ते अधिकृत करण्यासाठी कंगना रनौत मुंबई पालिकेकडे रितसर अर्ज करणार आहे.

याबद्दल मुंबई पालिकेनं पुढील चार आठवड्यामध्ये कंगनाच्या अर्जावर काय निर्णय घेतला ते जाहीर करावे असा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेला दिला आहे. तसंच, अनधिकृत बांधकाम तोडकामाला स्थगिती कायम राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
तसंच, बीएमसीच्या आदेश कंगनाच्या विरोधात गेला तर बीएमसी कंगनाच्या विरोधात अपील करू शकते, यासाठी 2 आठवड्यांचा अवधी असणार आहे. निर्णय कंगनाच्या विरोधात जरी गेला तरी दोन आठवडे बीएमसीला कोणतीही कारवाई करता येणार नाही.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
