मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली ही ‘कोरोना’ कॉलर ट्यून ऐकून अनेकांना कंटाळा आला आहे. आता या कॉलर ट्यून विरोधात दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. “नमस्कार आज हमारा पूरा देश और विश्व कोरोनाकी चुनौती का सामना कर रहा हैं….” कोणालाही फोन लावला की सर्वात आधी हा आवाज ऐकायला येतो.
कोरोना कॉलर ट्यूनविरोधात याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीचं नाव समजू शकलेलं नाही. काही दिवसांपूर्वी एका वैतागलेल्या नेटकऱ्याने थेट अमिताभ बच्चन यांना ट्विटवर प्रश्न विचारला होता की, ही कॉलरट्यून नक्की कधी बंद केली जाणार आहे. अमिताभ बच्चन यांनी विनम्रपणे त्या व्यक्तीला सांगितलं, ‘माझं काम फक्त व्हॉइस ओव्हर देण्याचं असतं. कोणतीही जाहिरात किंवा कॉलरट्यून कधी सुरू करायची आणि कधी बंद करायची याचा निर्णय माझ्या हातात नसतो. तुम्हाला होण्याऱ्या त्रासाबद्दल मी तुमची माफी मागतो.’
कोरोना जेव्हा सुरू झाला तेव्हा नागरिकांना कोरोनाच्या नियमांबद्दल माहिती मिळावी यासाठी ही कॉलर ट्यून सुरू करण्यात आली होती. पण आता कोरोना येऊन 10 महिने उलटून गेले आहेत तरीही ही कॉलरट्यून सरकारकडून बंद करण्यात आलेली नाही.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
