मुंबई: वीज बिलाच्या मुद्यावरुन मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महावितरणनं वीज ग्राहकांना वीज बिल भरलं नाहीतर वीज कापण्याचा इशारा देण्यात आला आहे. सरकारकडून एका बाजूला वीज बील माफ करण्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. ऊर्जा मंत्री गोड बातमी देऊ असं सांगतात. 100 यूनिटपर्यंत वीज मोफत देऊ असं सागतात.
वीज बिल भरलं नाहीत तर वीज तोडण्याचा निर्णय हा तुघलकी स्वरुपाचा आहे. या सरकाला लोकांना निश्चितपणे अंधारात ढकलायचं आहे. हे सरकार लोकांच्या भल्यासाठी आल्याचं दाखवतं आहे मात्र ते तीन पक्षांच्या भल्यासाठी आलेले आहे. जनतेने सरकारला गाडून टाकावं, आवाहन बाळा नांदगावकर यांनी केले.
मनसे वीज बीलप्रश्नी रस्त्यावर उतरली, आंदोलन केले, निवेदन दिले हात जोडले, मनसेने वीज बिल प्रश्नी काय आणखी काय करायला पाहिजे, असा सवाल नांदगावकरांनी केला. हे सरकार लोकांना अंधारात ढकलणार असेल तर लोकांनीही राज्य सरकारला अंधारात ढकलायला तयार राहिलं पाहिजे, असं बाळा नांदगावकर म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
