पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रसिद्धीची गरज आहे त्यामुळे राज ठाकरे वीज बिलांच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी राज्य सरकारला लक्ष केले आहे, अशी बोचरी टीका जयंत पाटलांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
रुपाली पाटील म्हणाल्या की, राज ठाकरेंना प्रसिद्धीची गरज होती, म्हणूनच खासदारकीच्या निवडणुकांवेळी त्यांनी एक सभा घ्यावी, म्हणून आपण प्रयत्न करत होतात का ?, असा खोचक सवाल त्यांनी केला.

जयंत पाटील आज मंत्री आहेत, ऊर्जा मंत्रीपदी आपल्या सरकारमधील मंत्री असताना, बीजबिलाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना लुबाडण्याचं काम होतं आहे. त्यामुळे, सरकार म्हणून तुम्हाला हा जाब विचारण्यात आला आहे. कोणाला प्रसिद्धीची गरज आहे, हे सर्व जनतेला माहिती आहे, असे रुपाली पाटील म्हणाल्या.
पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करता पण मनसेवाले टप्प्यात आणून कार्यक्रम करतात. त्यामुळे नको ती वक्तव्ये करण्यापेक्षा आपण सर्वसामान्यांच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावावा हीच विनंती, असा जोरदार टोला देखील त्यांनी जयंत पाटील यांना लगावला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
