पंढरपूर : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिकेवर काल विकेंड लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून राज्यातल्या कोरोना सुपरस्प्रेडर टॉपटेन हॉटस्पॉट शहरांत आता सोलापूर जिल्ह्याचे नाव आले आहे. कोरोनाचे संकट पुन्हा वाढल्याने मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत आणि त्यानुसार पुन्हा मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आज सायंकाळी ७ वाजल्यापासून ते ३० एप्रिलपर्यंत विठुराया पुन्हा भाविकांसाठी कुलूपबंद होणार असून देवाचे नित्योपचार मात्र नियमितपणे सुरु राहणार आहेत.
आज शेवटच्या दिवशी देवाचे दर्शन मिळावे याकरीता भाविक दर्शन रांगेत आले असून सायंकाळी सात वाजता मंदिराला कुलुपे घातली जाणार आहेत. तसेच नवीन मराठी वर्षाची सुरवातही यंदा भाविकांना विठुरायाच्या दर्शनाविनाच करावी लागणार आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस