नवी दिल्ली : अमेरिकेच्या सरकारनं उत्पादन सुरक्षा कायदा लागू केल्यानं कच्चा माल मागवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात भारत सरकारनं हस्तक्षेप करावा, अशी मागणी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं केली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कोरोनावरील कोव्हिशिल्ड नावाच्या लसीचं उत्पादन सुरू आहे.
सीरम इन्स्टिट्यूटने 6 मार्च रोजी वाणिज्य सचिव अनूप वधावन आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. सारे जग कोरोना महामारी संपविण्यासाठी वेगाने काम करण्याची अपेक्षा ठेवून बसले आहे. अमेरिकेने हा औषधांसाठी लागणारा कच्चा माल अत्यवश्यक श्रेणीत टाकल्याने त्याचा थेट फटका उत्पादनावर बसण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणानंतर महिनाभरात दुसऱ्या लसीचा डोस देण्यासाठी मागणी वाढलेली आहे. अशातच जर कच्चा माल मिळाला नाही तर उत्पादन जवळपास ठप्प होण्याची भीती या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
कोरोनाची लस मागणी आणि पुरवठा यावर तिचे यश ठरणार आहे. जर लस वेळेवर मिळाली नाही तर त्याचा थेट परिणाम लसीकरणावर आणि कोरोना लढ्यावर जाणवणार असल्याने ही एक मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने अमेरिकेच्या या धोरणांमध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी सीरमने केली आहे. अन्यथा लशीचा तुटवडा जाणवेल.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस