पुणे : भाजप नेते रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यातील वादात पुन्हा एकदा भर पडली आहे. रावसाहेब दानवे यांनी आजवर माझ्यावर केंद्राच्या सत्तेचा वापर करून गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप जाधव यांनी केला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
हर्षवर्धन जाधव म्हणाले की, एकदा रावसाहेब दानवे मला एकदा म्हणाले होते की, तुला नाक घासत आणले नाही, तर रावसाहेब दानवे नाव सांगणार नाही. अशी मस्ती त्यांच्यामध्ये दिसून येते. त्यामुळे त्यांना कटाक्ष भावनेने सांगतो की, पुढील जालना लोकसभा मतदारसंघात पाडून दाखविल्याशिवाय राहणार नाही. नाही तर मी माझ्या बापाची अवलाद नाही.

केंद्राच्या सत्तेचा पुरेपूर वापर करून माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करतानाच, याबाबत राज्य सरकारने यात लक्ष घालावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यात लक्ष घालावं, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
