सांगली : वंचित, दुर्लक्षित तसेच पौष्टक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याकरिता अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. पिक स्पर्धेत ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस व तीळ ही रब्बी पिके आहेत. स्पर्धेत सहभागासाठी 31 डिसेंबर अखेर तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अर्ज जमा करावा. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या पिक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.
पिकस्पर्धेसाठी पुर्ण तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल. स्पर्धेत सहभागी लाभार्थीच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पिक स्पर्धेतील पिकाच्या कापणीसाठी प्लॉटची निवड ही सांख्यिकी विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार करण्यात येईल. या स्पर्धेत सर्व शेतकऱ्यांना भाग घेता येईल. स्पर्धेत भाग घेताना शेतकऱ्याकडे त्याच्या नावावर जमीन असली पाहिजे व तो स्वत: कसत असला पाहिजे.
स्पर्धा पातळी निहाय पिकस्पर्धा विजेते पहिले, दुसरे व तीसरे बक्षिस अनुक्रमे पुढीलप्रमाणे. तालुका पातळी – 5 हजार रू., 3 हजार रू., 2 हजार रू. जिल्हा पातळी – 10 हजार रू., 7 हजार रू., 5 हजार रू.. विभाग पातळी – 25 हजार रू., 20 हजार रू., 15 हजार रू. राज्य पातळी – 50 हजार रू., 40 हजार रू., 30 हजार रूपये.
एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धकास कोणत्याही पातळीवर स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क सर्वसाधारण गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी रक्कम 300 रूपये असल्याचे श्री. मास्तोळी यांनी सांगितले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
