म्हसवड : म्हसवड मध्ये गेली अनेक वर्षे पाणी पुरवठा योजना चालू असताना सुध्दा पाणी वाटपाचे नियोजन नगरपालिकेच्या अधिकारी यांना जमले नाही. पहिल्यापासूनच पेठेतील गावकऱ्यांना पाणी नेहमी चार दिवसांनी येते मात्र गावाबाहेर राहणाऱ्या दलित समाजाला मात्र सात दिवसांनी पाणी येते. त्यामुळे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देवून पाणी पुरवठा नियमित करावा अन्यथा नगरपालिकेच्या विरोधात आमरण उपोषण करण्याच्या इशारा धर्मराज लोखंडे निवेदनाद्वारे दिला आहे.
अलिकडे आठ नऊ दिवसांनी पाणी येते आहे. आम्ही वारंवार नगरपालिका प्रशासनाला लेखी व तोंडी तक्रार केली होती. परंतु फक्त कामचलाऊ उत्तर मिळत आहे. जर सर्वांना पाणीपट्टी सारखीच असेल मात्र पाणी वेगवेगळ्या दिवशी एकिकडे चार दिवसांनी पाणी येते व दूसरीकडे आठ दिवसांनी पाणी येते. हा कोणता न्याय? त्यामुळे आम्हांला गावाप्रमाणे चार दिवसांनी पाणी द्यावे अन्यथा आमची पाणीपट्टी माफ करावी.
श्रीमंतांना चार दिवसांनी पाणी येऊनही पाणीपट्टी तेवढीच व ज्यांना आठ दिवसांनी पाणी येऊनही पाणीपट्टी तेवढीच ही खुप मोठी तफावत आहे. याचा विचार नगरपालिकेच्या अधिकारी यांनी करावा. पाणी पुरवठा अपरात्री न करता दिवसा करावा. कष्टकरी मजूर आणि इतर ठिकाणी कामावर जाणारे नागरिक आहेत. कामावरून लोक कंटाळून येत असतात लोकांची रात्र पाणी भरण्यातच जाते. नागरिकांना यामुळे खूप मनःस्ताप होत आहे.
पाणीपुरवठा बाबत आठवड्यात बेमुदत उपोषणाचा इशारा धर्मराज लोखंडे यांनी दिला. सदरचे निवेदन म्हसवडचे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सचिन माने यांना मानवी हक्क अभियान महाराष्ट्र प्रदेश चे सातारा जिल्हा उपाध्यक्ष धर्मराज लोखंडे, संभाजी लोखंडे यांनी दिले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस