• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

करचुकवेगिरी प्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून एकास अटक

tdadmin by tdadmin
January 15, 2021
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

 

मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरोधात कार्यवाही सुरु ठेवत दि. १५ जानेवारी २०२१ रोजी अनुज महेश गुप्ता यांस विलेपार्ले, मुंबई येथून अटक केली आहे. अनुज गुप्ता यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे सॅवी फॅब्रिक्स; शिव टेक्सटाईल, शक्ती टेक्सटाईल अशा तीन कंपन्या महाराष्ट्रात तर सुभलिन फॅब्रिक्स व शुभमंगल टेक्सटाईल अशा दोन कंपन्या दादरा व नगर हवेली येथे वस्तू व सेवाकर कायाद्यान्वये नोंदणीकृत आहेत.


या पाच संस्थांच्या माध्यमातून अनुज गुप्ता याने गेल्या चार वर्षात साधारण रू.२७० कोटीहून अधिक रकमेची फक्त देयके खरेदी केल्याचे आढळून आले आहे. कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय दाखविलेल्या या बोगस खरेदी देयकांतून या पाच कंपन्यांनी सुमारे रू.३१ कोटीहून अधिक रकमेचा बोगस Input Tax Credit प्राप्त करून घेतला तसेच रू.११ कोटीहून अधिक रकमेचा प्रत्यक्ष परतावा शासनाकडून प्राप्त केला. सदर कंपन्यांनी E-Way Bill मध्ये नावे दाखविलेल्या विविधवाहतूकदारांनी आपण या पाच कंपन्यांसाठी प्रत्यक्षात मालाची वाहतूक केली नसल्याची कबुली तपासात दिली आहे. तसेच पाच कंपन्यांकडे त्यांनी दावा केलेल्या एकूण मालापैकी फक्त २०% एवढया रकमेचा माल प्रत्यक्ष आढळून आला. उर्वरित ८०% एवढ्या किंमतीचा माल या कंपन्यांकडे प्रत्यक्ष आढळून आला नाही. माल दादरा नगर हवेली येथील गोडाऊनमध्ये ठेवल्याचा दावा अनुज गुप्ता यांनी केल्यामुळे दादरा नगर हवेली वस्तू व सेवाकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास केला असता ही बाब उघडकीस आली.


अनुज गुप्ता यांस अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनुज गुप्ता यांचे हे कृत्य दखलपात्र व अजामिनपात्र गुन्हा असून वस्तू व सेवाकर कायदा २०१७ नुसार ०५ वर्षापर्यंतच्या तुरुंगवासास पात्र आहे. या सलग तिसऱ्या अटक कार्यवाहीतून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांना पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे, असे राज्यकर उपआयुक्त (जनसंपर्क) मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Previous Post

९ वी ते १२ वी पर्यंतचे खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस सुरू ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी ; अटी व शर्तीच्या अधिन राहूनच परवानगी

Next Post

आटपाडी तालुक्यातील ९ ग्रामपंचायतसाठी ७७.७९ टक्के मतदान ; सर्वात जास्त लेंगरेवाडी ८७.१६ तर बोंबेवाडी ग्रामपंचायतीच्या एका प्रभागासाठी फक्त ४.७१ टक्के मतदान ; गावनिहाय मतदान टक्केवाडी पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

Next Post

आटपाडी तालुक्यातील ९ ग्रामपंचायतसाठी ७७.७९ टक्के मतदान ; सर्वात जास्त लेंगरेवाडी ८७.१६ तर बोंबेवाडी ग्रामपंचायतीच्या एका प्रभागासाठी फक्त ४.७१ टक्के मतदान ; गावनिहाय मतदान टक्केवाडी पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

एकूण वाचक

  • 138,649

ताज्या बातम्या

“आता पंजाचा वापर होतो म्हणून कापून ठेवणार आहात का?” : नाना पटोलेंचा भाजप नेत्यांना सवाल

“आता पंजाचा वापर होतो म्हणून कापून ठेवणार आहात का?” : नाना पटोलेंचा भाजप नेत्यांना सवाल

March 5, 2021
“मी स्वत: मास्क न घातल्याने दंड भरला” : संजय राऊत

“मी स्वत: मास्क न घातल्याने दंड भरला” : संजय राऊत

March 5, 2021
सरकारचा जाहीर निषेध करुन हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा नाहीतर… : पडळकरांचा इशारा

सरकारचा जाहीर निषेध करुन हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा नाहीतर… : पडळकरांचा इशारा

March 5, 2021
“श्रीराम म्हणतात, मी तर भाजपच्या जाहीरनाम्यात पडून असतो” : सत्यजित तांबेंचा भाजपला टोला

“श्रीराम म्हणतात, मी तर भाजपच्या जाहीरनाम्यात पडून असतो” : सत्यजित तांबेंचा भाजपला टोला

March 5, 2021
अजित पवारांनी राज ठाकरेंना दिला अप्रत्यक्षपणे हा सल्ला

अजित पवारांनी राज ठाकरेंना दिला अप्रत्यक्षपणे हा सल्ला

March 5, 2021
विदर्भ व मराठवाड्याच्या विकासासाठी हे सरकार कटिबद्ध ;  एक रुपयाही कमी पडू देणार नाही : अजित पवार

ओबीसी आरक्षणाबाबत फडणवीस यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्र्यांची स्पष्टता

March 5, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143