मुंबई : आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून आता 50 रुपयांची वाढ एलपीजीच्या दरात करण्यात आल्यामुळे 14 किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरसाठी ग्राहकांना आता 769 रुपये मोजावे लागणार आहे. हे नवीन दर 15 फेब्रुवारी दुपारी 12 पासून लागू होणार आहे.
गॅस सिलेंडरच्या दरात फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. या अगोदर 4 फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 25 रूपयांनी वाढ झाली होती. सिलेंडरची किंमत 694 रूपयांवरून 719 रुपये करण्यात आली होती. तसेच नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलचे भावही गगनाला भिडले आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
