जळगाव : भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे संतापजनक आणि अपमानकारक शब्दात वर्णन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

भाजप खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत अपमानकारक शब्दात वर्णन करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर दिली आहे. पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर याबाबतचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. स्वाती चतुर्वेदींचे ट्विट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रिट्विट करत भाजपकडे दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल कारवाई करेल, असा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे.
भाजपच्या वेबसाइटवर रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
