सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या बोचऱ्या टीकेमुळे सध्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर चर्चेत आहेत. आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
गोपीचंद पडळकर हा बारका गडी आहे, पण राज्यभरात त्यांची चर्चा सुरु असल्याचे म्हणत पडळकर फक्त टीव्हीवर आले की लोक बघतात. आता पडळकर कोणाला काय बोलणार, याची लोकांना उत्सुकता असते, अशा शब्दात सदाभाऊ खोतांनी पडळकरांचे कौतुक केले. ते सांगलीत बोलत होते.

अहिल्याबाईंच्या पुतळ्याच्या अनावरणाविषयी बोलताना खोत म्हणाले की, जर मेंढपाळाच्या मुलाने त्यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले तर शरद पवार यांनी स्वत:च्याच हस्ते उद्घाटन करण्याचा हट्ट का धरला? हा मुद्दा केवळ पुतळ्याचा उद्घाटनाचा नाही. धनगर समाजाला फसवले गेल्यामुळे तो संतप्त झाला आहे. हीच फसवणारी माणसं आमच्या दैवताचं गुणगान गाणार असतील तर गोपीचंद पडळकर यांच्यासारखे वेडे पीर दोन हात करायला उभे राहतील. अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी शरद पवार यांना इतकेच प्रेम आहे तर आजपर्यंत त्यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील आरक्षण का मिळवून दिले नाही ?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
