मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर असताना राजकारणातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण काही दिवसापूर्वी झाल्याचे स्पष्ट झाले होते.आता अधिवेशनाच्या तोंडावर आणखी एका बड्या नेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.राज्याचे कॅबिनेट तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवर यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन निमित्त मुंबई येथे असून आज कोरोनाचे लक्षण दिसल्याने मी माझी कोव्हीड टेस्ट केली,टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव आला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार मी घेत आहे. लवकरच पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल.
तसेच, मागील 2 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांनी ,नागरिकांनी सुद्धा आपली काळजी घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस