मुंबई : अॅमेझॉन प्राईमवर नुकतीच रिलीज झालेली तांडव ही वेबसीरिज वादात अडकली आहे. या वेबसिरीजमध्ये हिंदू देवी देवतांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे.
चित्रपट किंवा वेब सीरिजच्या माध्यमातून कायम हिंदू देव-देवतांचा अपमान का केला जातो ? असा सवाल करत राम कदम यांनी अॅमेझॉन प्राईम आणि निर्मात्यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सर्व देशवासी आणि हिंदू बांधवांनी अॅमेझॉनवरून वस्तू खरेदी करणे त्वरित बंद करावे. ते हात जोडून माफी मागत नाही आणि तांडव वेबसीरिज पोर्टलवरून हटवत नाही, तोपर्यंत प्राईम व्हिडीओचे अॅप डिलीट करावे, असे आवाहन राम कदम यांनी केले आहे.
कोणाच्याही भावना दुखावण्याचा कोणाला अधिकार नाही. श्रद्धेची खिल्ली उडवणाऱ्यांना कठोर दंड होणार. आता संयम नाही, तर बुटांनी हिशोब होईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
