मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे थेट नाव घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. या प्रकरणावर बोलताना “आत्महत्या प्रकरणात कुठल्याही नेत्याचं कोणीही नाव घेत नाही.कोणत्याही नेत्याचा कसलाही संबंध नाही. या प्रकरणात सत्य काय ते चौकशीअंती समोर येईल,” असे म्हणत अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी संजय राठोड यांचा अप्रत्यक्षपणे बचाव केला.

तसेच यावेळी बोलताना भाजपला खोटं बोलण्याची सवय आहे. तो त्यांचा धंदा असल्याचे म्हणत त्यांनी भाजपवरही टीका केली. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीसुद्धा सीडी बाहेर काढणार असल्याचं म्हटलं होतं. पण आम्हाला हे योग्य वाटत नाही. एकमेकांवर चिखलफेकीचे प्रकरण बंद झाले पाहीजे,” असे मलिक म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
