आटपाडी : माजी मुख्यमंत्री राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना पोलीस दलाची सर्व खाती ही त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या अक्सेस बँकेमध्ये वळवली असल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप यांनी केला होता.
त्यांच्या या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांच्यावर एकेरी भाषेत टिप्पणी केल्याने त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीका होवू लागली. समाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी तर त्यांच्या या भाषेला मावलगिरी ची उपमा दिली.
परंतु आता मात्र अमृता फडणवीस यांचे माजी खासदार निलेश राणे यांनी सर्मथन केले असून भाई जगताप यांच्यावर “हा कसला भाई ! हा तर टपोरी” म्हणत टीका केली आहे. भाई जगताप तो टपोरी आहे ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं पण डरपोक असल्या मुळे त्या क्षेत्रात पण मागे राहिला. ज्या माणसाने स्वतःचं नाव ‘अशोक‘ बदलून ‘भाई‘ केलं असा माणूस काय लायकीचा आहे लक्षात येऊ शकतं. असे माजी खासदार निलेश राणे म्हणाले आहेत.
त्यामुळे आता भाई जगताप व निलेश राणे यांच्यात आरोपांच्या फैर्री झडअसल्याने त्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया मात्र मजेशीर असल्याने नेटकरी कोणाला ट्रोल करतात बघुया…
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस