मुंबई : देशाची चिंता वाढवणारी बातमी. कोरोनाचा उद्रेक दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदवला गेला आहे. देशात गेल्या 24 तासात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात देशात 1,15,736 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 1,28,01,785 इतकी झाली आहे. तसेच अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 8,43,473 लाखांवर पोहोचली आहे.
कोरोना सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय 2021मध्ये भारतात 600 पेक्षा जास्त लोकांचे मृत्यू झाले असून दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात आतापर्यंत 1,66,177 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस